एक पत्र वडिलांना ?

  • 324
  • 114

..!!ती कै बाबाना सा नमस्कार आता पर्यंत वेगवेगळ्या वेळी आपण अनेक पत्रे एकमेकांना लिहिली पण हे पहिलेच पत्र मी लिहिते आहे जे तुम्हाला पाठवू शकत नाही कीती लांब गेलाय तुम्ही मला सोडून ..आता असे वाटतेय हे पत्र तुमच्या कडे स्वताच घेवून यावे पण बघा ना तेही हातात नाहीये माझ्या लहान पणां पासून तुम्हाला सोडून कधी राहिलेच नाही तुमची लाडाची एकुलती एक आणी पहिली लेक होते मी पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणायचा मला तुम्ही .माझ्या आगमना मुळे तुमचे आयुष्य भरभराटीला आले असे वाटायचे तुम्हाला त्यामुळे खूप खूप कौतुक व्हायचे माझे ..जी वस्तू मागेन ती देण्या कडे कटाक्ष असायचा तुमचा तुमच्या महिन्याच्या पगारातून नेहेमी आधी माझेच  हट्ट पुरवले जायचे आई तर लटक्या