.पोळी ....महाराष्ट्रीयन जीवनाचा महत्वाचा भाग हीला पोळी /परोठे/फुलके /चपाती अशा अनेक नावाने ओळखले जाते आम्ही रोजच्या जेवणात घडीची पोळी खातो .मला पहिल्यापासून पोळी करायला फार आवडत असे .तसे लग्न होई पर्यंत घरी कधीच कुठले काम मला आईने सांगितले नाही पण कधीतरी मला लहर आली की सुटीच्या दिवशी मीच आईकडून पोळी करायला दे अशी भुणभुण लावायची ..मग आई म्हणायची...अग कशाला पाहिजे आत्तापासून शिकायला नंतर करायचेच आहे सगळे पण माझा हेका पाहून ती मला पोळी करायला शिकवायची .भाकरी सुद्धा मी आईकडून शिकून तेव्हा चांगली करीत असे .माझी आई शिक्षिका होती मार्च एप्रिलच्या महिन्यात तिची सकाळची शाळा असे .मी कॉलेजला गेल्यावर वडीलांची बदली सांगलीला झाली होती त्याना आठ