प्लेन एकच होतं प्लॅन वेगळे

  • 246
  • 84

"प्लेन एकच होतं..." पण प्लॅन अनेक होते. "टर्मिनल नंबर २. इंटरनॅशनल विमान. बोर्डिंग सुरू झालं होतं.एकामागोमाग एक प्रवासी, हातात बोर्डिंग पास, हातात बॅग, कधी डोळ्यांत आशा… कधी काळजी.कुठेही एकसंधपणा नव्हता —प्रत्येकाचं नाव वेगळं,प्रत्येकाचा पत्ता वेगळा,प्रत्येकाचं वय वेगळं, प्रत्येकांचा सीट नंबर वेगळा कोणी नवजात बाळाच्या कुशीत लपलेलं बाळकडू होतं… तर कोणी ऐंशी पार करूनही शेवटचं युरोप दर्शन बघायला निघालं होतं.कुणी फॉर्मल कपड्यांत मुलाखतीला चाललं होतं,कुणी हनिमूनसाठी,कुणी बिझनेस टूरसाठी.कोणी तिथेच वास्तव करण्यासाठी..पण सगळ्यांचं प्लेन एकच होतं.सीट नंबर 6A —आर्या नावाची तरुणी, पहिल्यांदाच आईपासून लांब निघाली होती. स्वप्न होतं – मोठं होण्याचं, स्वतःचं घर घेण्याचं. तिचा बोर्डिंग पास मोडून टाकताना ती थोडं थरथरली होती – पण