५ देव थांबता थांबता बरेच दिवस थांबला. त्याला आपल्या आईचा प्रश्न सतावत होता. ती जास्त म्हातारी होत चालली होती. त्यातच त्यानं गांधर्व विवाह केला व जिच्यासोबत विवाह केला. तिला आश्वासन दिलं होतं की तो मंजूच्या प्रकरणापासून मुक्त झाला की तिच्याशी विवाह करेल. ती मंजू....... मंजू देवला हुंगत नव्हती. तशी ती भावही देत नव्हती. त्याला मात्र मंजूची आठवण यायची व तो तिला भेटायला जायचा. परंतु ती सतत अपमानीत करीत होती त्याला. तसा काळ पालटला. त्यानं गांधर्व विवाह का होईना केला. तद्नंतर त्यानं मंजूकडे जाणंच सोडलं. त्यानं करुणाशी