सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 9

  • 1.1k
  • 1
  • 381

 पण तीन वाडीतले  मिळून पंचवीसेक  कुत्रे असल्यामुळे त्याना पळ काढता येत नव्हता.वाटेत  आलेल्या  लहान सहान झाळीत घुसून  त्यांचा बचवाचा प्रयत्न सुरू होता. गडी  जवळ गेल्यावर कुत्र्याना  जोर आला. कुत्रे झाळीत घुसल्यावर  एका डुकराला  नाईलाजाने बाहेर पडावे लागले .आता ते गड्यांच्या वेढ्यातच  गावले . दांडे कुऱ्हाडी घेवून गडी तूटून पडले. त्या गडबडीत दांड्याचा अवघाती फटका बसून एक कुत्रा  कमरेतूनच मोडला. दुसरा  डुकर मोहरा फिरवून  पुन्हा राईच्या गचवणात रिगला . त्याच्या पाठोपाठ कुत्रेही रिगले. पण थोडसं आत गेल्यावर घोट्याच्या  वेली , तोरणी  याची गचवड होती  त्यातून कुत्र्याना पुढे जातायेईना.  तासभर रेंगाळून कुत्रे परत आले.शिकार बरीच मिळाली होती. कमरेत मोडलेला कुत्रा वेदनानी तळमळत भीषण केकाटत होता. त्याला अती तळमळत ठेवण्यापेक्षा मारून