मोबाईल

  • 1.4k
  • 422

  रोजच्या सवयीप्रमाणेच आजही रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्यानंतर जेवण करुन वैभव वरच्या खोलीमध्ये जावून मोबाईल पाहत बसला. बायकोचे भांडी व इतर कामे आवरेपर्यंत तो वरच्या खोलीमध्ये जावून मोबाईल पाहत बसायचा. मोबाईलवरील विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसिरीज पाहायचा. तर कधी नुसता इंस्टाग्रामवर रिल्स पाहत बसायचा. तर कधी फेसबुक चाळत बसायचा. सुट्टीच्या दिवशी तर तो नऊ ते दहा भागांची वेबसिरीज पाहून संपवायचा.             अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मुलभूत गरजांव्यतिरिक्त मोबाईल ही त्याची चौथी मुलभूत गरज झाली होती. सकाळची सुरुवात त्याची मोबाईलमध्ये पाहूनच व्हायची. व्हॉट्सअपवर कोणाचा मेसेज आला. आपले स्टेटस कोणी पाहिले. कोणी काय स्टेटस ठेवले. हे काम तो सकाळी झोपतून