कृतांत - भाग 1

  • 10.1k
  • 5.4k

कृतांत (भाग १)शके १४६०सगळीकडे निरव शांतता होती. काळोख साऱ्या जगावर अधिराज्य गाजवत होता. अश्यावेळी एका घनदाट जंगलात झाडांच्या गर्दीत मशालींच्या पिवळ्या प्रकाशात काही गुप्त हालचाली सुरू होत्या. काळा वेष परिधान केलेले आठजण  वर्तुळाकार बसले होते. मध्यभागी लाकडाची धूनी पेटवली होती.ओबड धोबड विचीत्र अश्या दगडी मुर्त्यांच्यी मांडणीकेली होती. काही मानवी खोपड्यांमध्ये कसलातरी द्रव भरून ठेवला होता.धूनीच्या बाजूला एका दगडावर एक जिवंत घुबड बसलं होत. मशालींच्या पिवळ्या प्रकाशात त्याचे निळसर - हिरवट डोळे चकाकत होते.ते घुबड एकदम निच्छल बसले होते. धुनीच्या पलीकडे जमिनीवर एका शव ठेवले होते.काही प्रहरांपूर्वी तो मृत झाला होता. त्याला ठेवलेल्या जमिनी भोवताली वटवाघूळच्या रक्ताने विविध चिन्हे व मंत्र लिहिले