"'म्युट' नवरा" “तो बोलतो… पण त्याच्या मौनात”कधी कधी मला खरंच वाटतं –ह्याच्या आईने याला नऊ महिने पोटात फक्त ‘शांत’ राहायला शिकवलं होतं का?म्हणजे काय ना, घरातल्या सगळ्या गप्पा मी एकटीने भरून काढाव्यात का?माझं लग्न ठरताना घरचे म्हणाले,“खूपच शांत स्वभाव आहे हो मुलाचा.”माझ्या बाबांनी मोठ्या विश्वासानं म्हटलं,“बोलक्या मुलीला शांत नवरा हवेच!”पण लग्न झाल्यावर कळलं –हा ‘शांत’ नसून ‘अबोल’ आहे!दिवसभरातून जर तीन वाक्यं बोलली, तर समजायचं आज याने "गप्पांचा कोटा" ओलांडलाय!पहिलं वाक्य – “चहा आहे का?”दुसरं – “बॅग कुठे ठेवली आहेस?”तिसरं – “झोपतो आता.”बस्स! एवढंच!कधी कधी मला वाटतं,मी ह्या घरात बायको नाही, एक RJ आहे –नॉनस्टॉप बोलणं आणि फक्त एक कावू श्रोता –