विहीर आणि पोहरा

  • 570
  • 180

गावाच्या शेवटच्या टोकाला एक साधी, पण खोल विहीर होती. विहिरीभोवती वडाची सावली आणि शेजारीच जुनी शाळा होती. ही शाळा म्हणजे गावाचा जीव. आणि त्या शाळेचा आत्मा होते गुरुजी – रामकाका.रामकाका म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं. त्यांनी पन्नास वर्षं मुलांना शिकवलं होतं. त्यांचा आवाज धीमा पण प्रभावी, त्यांचं बोलणं थेट मनाला भिडणारं, आणि त्यांचा अनुभव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खजिना होता. ते म्हणायचे, "शिकवणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचवणं नाही, तर जीवन शिकवणं होय."शाळेच्या प्रत्येक वर्गात त्यांच्या शिकवण्याचा प