"मी आई आहे… पण अबला नाही!"सकाळी दहाची वेळ. मुलगा शाळेत गेला होता, आणि मी किराणा घेण्यासाठी स्कूटर घेऊन बाहेर पडले. रस्त्यावर एका चौकात माझी गाडी थांबवली, इतक्यात शेजारून एक बाईकवाला माझ्याकडे बघत, अजब हसत, माझ्याच अंगावरून गाडी घालायच्या थाटात पुढे गेला. क्षणभर काहीच कळेना. त्यांची नजर किती वाईट होती?एका मिनिटात मी गाडी स्टार्ट केली. पुढच्या सिग्नलवर तो परत दिसला. त्याचं लक्ष माझ्यावरच. मी स्कूटर त्याच्या समोर नेऊन उभी केली आणि मोजक्या शब्दांत विचारलं,"काय पाहायचंय? ट्रॅफिक की तुझं भान हरवलेलं माणुसपण?" म्हणूनच स्त्रिया स्वतःला असुरक्षित समजतात पण तुमच्यासारखे काही लोक आजही समाजात आहे.स्त्रियांना दबून राहतात.तो गडबडला, काहीसं बोलायचा प्रयत्न केला. आसपास