सकाळच्या नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन घरातला सर्वाधिक आवडीचा खाद्य पदार्थ म्हणजे पोहे. पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, पोहे बनवण्याची पद्धत बदलते. कधी फोडणीचे पोहे कधी वरून फोडणी घातलेले कडक पोहे तर कधी लावलेले पोहे कधी दूध गुळ पोहेकधी ताक मितकुट पोहे कधी दही पोहे कधी कोळाचेपोहे ज्याची त्याची आवड म्हणायची मात्र त्या त्या व्यक्तीला अगदी तसेच पोहे लागतात बरं..जरा इकडे तिकडे चालत नाही फोडणीचे पोहे सुद्धा अनेक प्रकारे केले जातात कुणाला त्या पोह्यात फक्त शेंगदाणे घातलेले आवडतात दुसरे काही नको कोणी बटाटे पोहे शौकीन फोडणीत खरपूस बटाटे तळून त्यावर पोहे टाकून केले की फर्मास चव येते माझी आई टोमॅटो पोहे छान करीत असे माझ्या सासरी हा पदार्थ ठाऊक नव्हता मी सुरू केल्यावर सर्वांना