दूरवरचा दीवा

  • 1.2k
  • 390

कथा: दूरवरचा दीवापाऊस नुकताच थांबला होता. रस्त्यावरून माणसं झपाट्याने जात होती. कधी काळी त्याच रस्त्याने चालणारा एक तरुण, आता एका मोठ्या NGO चा संचालक होता – विष्णू प्रकाश उर्फ 'विषाल'.त्याच्या मनात अजूनही एक नाव अलगद अलगद वसलेलं होतं – प्रेमा.ती गोंडस हसणारी, सरळ केसांची, आणि डोळ्यांत निरागसतेचं पाणी असलेली मुलगी त्याच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण होती. कॉलेजमधून एकत्र घरी चालताना तिचं म्हणणं असायचं, "बघ, विषाल, स्वप्नं पाहणं चांगलं... पण जेव्हा घरात चूल पेटवायची जबाबदारी असते, तेव्हा तीच स्वप्नं खूप दूर वाटतात..."तो तेव्हा फक्त हसायचा. कारण त्याच्या स्वप्नात फक्त तीच होती. पण ते स्वप्न, गरिबीच्या काचांनी फुटून गेलं.ती लग्न करून निघून गेली.