कांदे पोहे कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे दिसायला साधे असतात... पण त्यात दडलेली भावनांची खोली इतकी असते की काळजात घर करून जातात."पाहणं" – हा शब्द जरी उच्चारला तरी घरात एक वेगळीच उत्सुकता, साशंकता, अनामिक ओढ आणि थोडं चिंतेचं सावट पसरतं.पण त्या सगळ्याच्या मध्ये एक गोष्ट मात्र नेहमी असते — कांदे पोहे.हो, फक्त पोहे नाहीत... कांदे पोहे.जणू पाहणं म्हणजे केवळ दोघांना एकमेकांना पाहणं नाही, तर पोह्यांच्या निमित्ताने एकमेकांच्या स्वभावाची, चवांची, भावना ओळखण्याची पहिली वाटचाल. पाहण्याचा कार्यक्रम घरात उत्साहाचं, आनंदी वातावरण होतं. दिवाणखान्यात पाहुणे अगदी वेळेत येऊन स्थानापन्न झाले होते. सुमनच्या आई वडिलांनी त्यांचे स्वागत केलं. गप्पा ओघ सुरू झाला होता.