भाग – २८ सावली आता घरून निघून थेट पियुषचा घरी जाऊन पोहोचली होती. तेथे जाऊन तीने तो कागद पियुषला दाखवला आणि म्हणाली, “ पियुष हा नंबर तू तुझ्या सिस्टम वर अपलोड कर आणि हा नंबर कुठे जातो येतो आणि काय कुणाशी बोलतो याची सगळी माहिती मला रेकोर्ड करून दे.” पियुषने सावलीला विचारले, “ हा कुणाचा नंबर आहे सावली.” सावलीने म्हटले, “ ते मी नंतर तुला सांगेन आधी हे काम तू कर. त्याचबरोबर मला अनोळख्या नंबरने कॉल आलेला होता तो नंबर सुद्धा ट्रेस कर मला वाटते नक्की हा नंबर त्या मला फोन करण्याचा असणार ज्याचाबाद्द्ल मला माहिती काढायची आणि