घरच्या_आंब्यांची_कहाणी ?

  • 370
  • 108

आंबा पहिल्यापासून अतिशय आवडत फळ फळांचा राजाच तो .. त्यात घरी वडिलांना आंब्याची अतिशय आवड अगदी बाजारात आंबा आल्यापासून ते आंबा मिळणे बंद होईपर्यंत घरी आमरस असायचा मात्र त्यावेळी जास्त करून पायरी आंबा मिळायचा हापुस खिशाला परवडत नसे...माझ्या आजोळी सुध्दा शेतात आंब्याची दोन झाडे होती मे महिन्यात तिकडे दोन खोल्या भरून आंब्याची आढी घातलेली असे आढी घातली की आमंत्रण येई ..लगेच आम्ही सर्व भावंडे तेव्हा तेथेच सुट्टी साठी जात असू . आणि मनसोक्त आंबे खात असू यानंतर यथावकाश लग्न झाले काही वर्षानी जेव्हा घर बांधायचे ठरवले तेव्हा मोठी जागा बागेसाठी असेल अशाच ठिकाणी घर बांधले चिक्कू ..पेरू ..अंजीर.. केळी ..