मेंदू, मशीन आणि मी...

  • 450
  • 138

आज मीच आमच्या मॅनेजर सरांना म्हणालो –“चला सर, एक कप चहा घेऊया…”आम्ही दोघं ऑफिसच्या बाजूच्या नेहमीच्या हॉटेलात चहासाठी आलो होतो.“अण्णा, दोन स्पेशल मिल्क चहा घेऊन ये!”मी आवाज दिला. अण्णा नेहमीसारखा आपुलकीने टेबलजवळ आला आणि म्हणाला –“सर, आमचा चहा तर नेहमीच स्पेशल असतो. किती वर्षं झाली इथं येऊन!”मी हसून म्हणालो, “या वेळी थोडं जास्त आलं टाकून दे…”पुढे आमचे Automation & Programming चे सर माझ्यासमोर बसले होते.आज आम्ही दोघंच चहासाठी खाली आलो होतो.खरं तर, चहा हे एक निमित्त होतं — अशा गोष्टी बोलण्यासाठी,ज्या आपण ऑफिसमध्ये सहज बोलू शकत नाही...मी: “सर, तुम्ही मला या वेळी Machine Learning च्या प्रोजेक्टमध्ये घेतलं नाही.”सर: “अरे, तो