स्पर्श पावसाचा ?️ - 18

  • 558
  • 141

आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा ट्रेनला अजून थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही चौघं तिथेच एका बाकावर थांबलो.तेजी आणि राज एका बाजूला एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मी त्यांना विचारलं, “चहा पिऊया का?”ते दोघं काहीच बोलले नाहीत. कदाचित त्यांच्या मनात लग्नानंतरचं आयुष्य, जबाबदाऱ्या आणि घरच्यांचा विचार चालू असावा. मीही त्यांना त्रास न देता तिथल्याच एका टपरीकडे चहा घ्यायला निघालो.माझ्यामागे वरषा आली. "माझ्यासाठी नाही विचारलंस चहा?" ती थोड्या मिश्कील पण हळुवार स्वरात म्हणाली."अरे, सॉरी… लक्षच नव्हतं. थोडा वेगळ्या विचारात होतो," मी थोडं लाजून म्हणालो.ती हसली — तसं सगळंच जरा हलकं वाटलं.चहा घेतला, आणि आम्ही दोघं गप्प बसलो.ती राज आणि तेजीकडे पाहात म्हणाली, “खूप सुंदर