"सासऱ्यांच्या सावलीतलं बाळंतपण" जिथे नवरा त्या काळात जवळ नसतो, आणि हे पहिलं बाळंतपण फक्त सासऱ्यांच्या सावलीत, आईशिवाय, आणि सामान्य स्त्रीच्या धीरगंभीर अनुभवांतून उलगडतं."आई नाही, नवरा नाही… तरी मी बिनधास्त होते!"ती रात्र अजूनही झोपेत थरथरायला लावते. दवाखान्याच्या खोलीत सलाईनचा थेंब-थेंब टपकणं चाललेलं… आणि माझ्या मनात विचारांचे कढ कलकलत होते.पहिलं बाळंतपण!आई जवळ नाही… बाबांची तब्येत खराब म्हणून ती नाईलाजानं गावी.सासूबाईंचंही आजारी पडल्या , त्यांना दम लागायचा…आणि नवरा?नवऱ्याला कंपनीनं ऑनसाइट प्रोजेक्टवर जपानला पाठवलं होतं. बाळंतपणाचं तारखांमध्ये ठरवलेलं होतं, तोवर तो यायचा म्हणाला होता…पण बाळाला जास्त काळ वाट पाहणं जमलं नाही.मीच ठरवलेलं सर्व विसरून आली होते इथे – आईशिवाय, नवऱ्याशिवाय!"मुलीच्या वाट्याला आई येते…सूनबाईच्या वाट्याला मात्र अनुभव