ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 18

  • 615
  • 225

प्रकरण १५ : साक्षीदारांची यादी          अभय देशपांडेचा खून होताच, चेतनच्या मनात एकच गोष्ट ठाम झाली — ब्लॅक डायमंड नेटवर्क नष्ट केल्याशिवाय आता थांबायचं नाही !  गणपत चौधरीची डायरी त्याला मिळवायची होती. तीच अखेरचं रहस्य उघड करू शकत होती ! . चौधरी वाड्यातील शोधमोहीम चेतन ताबडतोब गणपत चौधरीच्या जुन्या वाड्यात पोहोचला. देशमुखने आधीच पोलिस बंदोबस्त वाढवला होता, पण डायरी अजून कुठे आहे हे कोणालाच माहित नव्हतं . " देशमुख , गणपत चौधरीच्या खासगी कागदपत्रांचा तपास झालाय का?" चेतनने विचारलं. " सगळी कागदपत्रं तपासली , पण डायरी कुठेच सापडली नाही!" देशमुख निराशेने म्हणाला . . चेतनचा अचूक अंदाज चेतन विचारात पडला