साध वरण भात

  • 825
  • 279

"वरणभात"साधं -वरण-भाताच्या वासात आई शोधताना.."आई, आज पण वरण-भात?" – चिडून मी विचारलं.कॉलेजातून नुकताच आलेलो. ताटात गरम मऊसूत भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग आणि चिमूटभर साखर आणि वर एक चमचा साजूक तूप.माझं चेहरा बघून आई थोडं हसली, म्हणाली, “झणझणीत पावभाजी हवी होती ना? किंवा मसालेदार रस्सा भाजी.पण आज पिठं नव्हतंरे,म्हणून वाटलं वरण-भात करावा."माझा मूड अजूनच खराब झाला. माझ्यासाठी साधं वरण-भात म्हणजे कंटाळवाणं जेवण.कॉलेजमधले मित्र सांगायचे – "आपल्याकडे पिझ्झा, पास्ता, बर्गर!"आणि मी? रोज एकतर पोळी-भाजी, नाहीतर वरण-भात.त्या दिवशी मी चिडून खाल्लंही नाही. बॅग घेतली आणि बाहेर पडलो.वर्षं उलटली… मी आता पुण्यात मोठ्या कंपनीत कामाला होतो.रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं, झणझणीत चव,