हो! "मीं आहॆ मध्यमवर्गीय " मी सौ तृप्ती देव.आज रविवार स्पेशल, घरगुती स्वादाची हॉटेलिंग!"रविवारचा दिवस.संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर एक निवांत श्वास घेण्याचा दिवस.घरात सगळे जमलेले असतात. कुणाला उठायला उशीर होतो, कुणी पेपर वाचत असतो, कुणी चहा घेऊन टेरेसवर बसलेलं असतं. पण एक गोष्ट ठरलेली असते – आज जेवण स्पेशल असणार!हॉटेलिंग?ऑनलाइन फूड?छे! आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरांमध्ये त्या 'luxury' गोष्टी फार कमीच परवडतात.त्यात आजीचं वाक्य आठवतं –"हॉटेलात पैशाने स्वाद मिळतो, पण घरात मनाने प्रेम!"म्हणूनच आज आईच्या हातचा बटाट्याचा रस्सा, पापड, कोशिंबीर, गरमागरम पोळ्या आणि एखादं गोड – कधी श्रीखंड तर कधी फक्त गुलाबजाम.बाबा रेडिओवर गाणी लावतात – 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू…'आणि स्वयंपाकघरातून