ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 17

  • 597
  • 171

प्रकरण १४ : मृत्यूचा साक्षीदार       ब्लॅक डायमंडच्या गूढ प्रकरणाचा शोध घेत चेतन अधिक खोलवर जाऊ लागला तसतसे त्याच्याभोवती संकटांचे जाळे घट्ट होत होते . गणपत चौधरीच्या खुनाच्या फाईलमधून मिळालेली माहिती धक्कादायक होती — श्याम फक्त एक प्यादा होता. या खेळाचा खरा सूत्रधार अजूनही अज्ञात होता . . एक अनपेक्षित कॉल त्याच रात्री , चेतनच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला .  " माझ्याकडे माहिती आहे … पण मला जीव मुठीत धरून वावरावं लागतंय ! " आवाज घाईत आणि भीतीने भरलेला होता. " तू कोण आहेस ? " चेतनने विचारले .  " मी … मी गणपत चौधरींचा जुना अकाउंटंट आहे