फिरायला अवश्य जावे. पण......

  • 525
  • 156

फिरायला अवश्य जा. पण.......           आपण फिरायला जातो. कारण आपल्याला फिरणे आवडते. निसर्ग पाहाणं आवडतं. किल्ले व प्रेक्षणीय स्थळं पाहाणं आवडतं. जंगल, वनसंपदा व प्राणी पाहाणं आवडतं. विचित्र वस्तू वस्तू, व्यक्ती पाहाणं आवडतं. धार्मिक स्थळं पाहाणं आवडतं. धरणं, जलाशयं, नदी नाले, समुद्र पाहाणं आवडतं. त्यात अंघोळ करणं आवडतं. त्यासाठीच आपण फिरायला जात असतो.           फिरणे अतिशय सुंदर कृती. कुणी सहलीसाठी फिरायला जात असतात. तर कुणी घरी कंटाळवाणं वाटते म्हणून फिरायला जात असतात. कुणी कामानिमित्त फिरायला जात असतात. कुणी मनोरंजन म्हणून फिरायला जात असतात तर कुणी कोणत्या कारणानं. फक्त त्यांच्यासाठी फिरणं महत्वाचं असतं.