मंत्रीमहोदयांची मिसळ पार्टी

  • 468
  • 195

मंत्रीमहोदयांची मिसळ पार्टीसकाळी आठ वाजता पंचायत समितीच्या कार्यालयात उंदरांनी धिंगाणा घातला होता. मुख्य कारण म्हणजे, मंत्रीमहोदय आज गावी येणार होते. आणि यावेळी त्यांना कुठल्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन करायचं नव्हतं... तर मिसळ खायची होती."मिसळ? मंत्री येणार फक्त मिसळ खायला?"गावाचा कुबड्या पाटील चकित झाला होता. याआधी मंत्री आले की रस्ता, पाणी, वीज, आणि काही ना काही जाहीर केलं जात असे. पण यावेळी मंत्री स्वतः फोन करून म्हणाले होते, "तुमच्या गावची मिसळ ऐकलीय फार फेमस आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. आलोच पाहिजे!"मुख्याध्यापक बोडके सरांनी हे ऐकताच मिसळ मंडळाची तातडीने बैठक बोलावली. मिसळ मंडळ, हो, गावात एक अशी संस्था होती जी वर्षभर मिसळ कार्यक्रम राबवायची,