सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 4

(213)
  • 3k
  • 1
  • 1.2k

रस्त्याचं काम हे भाऊच्या आहारा बाहेरचं. तो काय पैशाची मोट बांधून बसलेला सावकार गडी थोडाच होता? एवढी  मोठी  गडी पैऱ्यांची  फैलं   सांभाळायची म्हणजे काय चेष्टा नव्हे. महिना दोन महिने गेल्यावर कामगार मजुरीला हात पगळणार. सरकारी पैसा  काय झटपट थोडाच मिळणार? सरकारी काम नी सहा महिने थांब अशी  लांबड लागणार. एकदा पत गेली विषय संपला. म्हणून ह्या व्यवहारात भाऊने चार आणे ? आठ आणे  भागीदारी आपल्याला द्यावी. खर्च सगळा  आपण उचलू. मात्र या कामात खुटवळ नी  सिलीपाट  असेल  तो सगळा बळीला द्यायचा. ती रक्कम वजा करून राहिलेली रक्कम जेंव्हा कधी  सरकारी  पैसा येईल  तेंव्हा सावकाश  मिळाली तरी चालेल. असा प्रस्ताव बळीने