धाकू नी बाबल्या हे इमानी होते. कामगारांवर त्यांचा चांगलाच वचक होता. जरा कोणी दुर्लक्ष हलगर्जीपणा करताना आढळला तर दोघेही त्याला फैलावर घेत. “तीन सीजन पुरणारा ह्या काम भाऊंच्या म्हेरबानीन मिळालेला हा. ह्या काम चांगला झाला तर भाऊंची पत वाढात नी आणकी आणकी कामा तेंका मिळती. ते तगले तर आपल्याक कायमचे रोजमुरो मिळात. तवा आपल्या घरचा समजून आंग मोडून काम करूक व्हया...... भाऊ काय सदी आमच्यार नदर करूक ऱ्हवणार नाय. पन आमी तेचे मुखत्यारी आसंव ... इला काय नी ग्येला काय असला हलगर्जीपान आमका खपणार नाय. आमका ह्या सांग़ॉची येळच येवक् देव नुको....... ” हे त्यांचं सांगणं असे. येण्या जाण्याच्या वेळा