अनुबंध बंधनाचे.....( भाग ४३ )शहरातुन बाहेर दुर एका मोठ्या हॉटेलच्या गेट मधुन त्यांची गाडी आत जाते. तोपर्यंत प्रेम फक्त हाच विचार करत होता की, आता नक्की काय झालं असेल. आज तर यांच्यासोबत मेघाचे वडील पण नव्हते. मग आज जर काही झाले तर यांच्या तावडीतून मला कोण सोडवणार....? डोक्यात खुप काही येत होते, तेवढ्यात गाडी त्या हॉटेलच्या पार्किंग मधे थांबते. डॅड गाडी बंद करून बाहेर पडतात. प्रेम घाबरतच गाडीचा डोअर खोलून बाहेर येतो. त्याला असं पाहून ते तिथेच त्याला बोलतात.डॅड : मी पुन्हा एकदा तुला सांगतोय... घाबरू नको...! आपण इथे फक्त बोलायला आलो आहोत, सो रिलॅक्स...!* असं बोलुन ते त्याला त्या हॉटेल मधील