कपाटात सापडलेला नवरा

(31)
  • 1.9k
  • 837

कपाटात सापडलेला नवरा.(एक साधीशी घटना, पण मनात घर करणारी गोष्ट.)सकाळी ८ वाजले होते.अर्जुनच्या ऑफिसची वेळ निघून जात होती. घाई, गडबड, मोबाईल चार्जिंगला लावायचा राहिला, टिफिन तो पण हातात हवा , आणि सगळ्यात महत्त्वाचं — आज मीटिंग आहे, त्यामुळे नीटस निळा शर्ट हवा होता.त्याने कपाट उघडलं आणि शर्ट शोधू लागला.शर्ट कुठे दिसेना.तो कपाट खणखणून पाहतोय, एकेक हॅंगेर्स बाजूला सारतोय, आणि मग बायकोला आवाज देतो —"कविता… माझा निळा शर्ट कुठं आहे?"स्वयंपाकघरातून तांदूळ धुण्याचा आवाज ती थांबवते आणि एक शांत, पण धार असलेला आवाज येतो —स्वयंपाक खोलीच्या बाहेर.."तुला तुझा शर्ट सापडत नाही, पण माझ्या चुका लगेच सापडतात!""मी जर रोज तुझ्यासारखं विसरत गेले, तर