विवाह कशासाठी? सुखासाठी की दु:खासाठी? *विवाह कशासाठी ? असा प्रश्न सर्वांना पडतच असेल. तसा पडल्याशिवाय राहात नाही. लोकं त्या विवाहाचा संबंध फक्त अश्लील गोष्टीशी जोडतात. अन् ती गोष्टही खरी आहे. कारण विधात्यानं ती गोष्ट विवाह रुपानं का होईना, विवाहात समाविष्ट केल्यानं विवाह टिकतो. काही लोकांचा टिकत नाही. कारण त्यांचे विवाहबाह्य विवाहापुर्वीच संबंध असतात किंवा विवाहानंतर निर्माण होत असतात. परंतु ती कारणं लपवून काही लोकं भलतीच कारणं पुढं करीत असतात व घटस्फोट घेत असतात.* विवाह हे अश्लील बाबी करण्यासाठी नसतात. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण विवाहानंतर खरं सुख व्यक्तीच्या जीवनात निर्माण होत असते. तसं