साधिकाने शलाका आणलेले पाहून अजित आणि अभिमन्यू विचारात पडतात. तेवढ्यात आरती एकटीच खाली आल्याने अभिमन्यूला हायसे वाटते. शलाका घरात असताना श्रेया तिच्यासमोर येऊ नये असे त्याला मनोमन वाटते. आरती : साधिका, तू हिला घेऊन का आली आहेस? साधिका : काकी, ही फार उपयोगाची आहे आपल्या… अभिमन्यू : हिला असं घरात घेऊन येणं धोक्याचं आहे…उगाच नको त्या फंदात मला पडायचं नाहीयेय…तुला हिला बाहेर सोडून ये… अजित : अभि, साधिका बोलतेय त्याचा रोख माझ्या लक्षात आला आहे…मी तिच्याशी सहमत आहे… आरती : मीही… आणि अभि हिच्याकडे कोणत्याही प्रकारची शक्ती नाही… अभिमन्यू : आई….? शलाका :