आरती श्रेयाला घरी घेऊन येते आणि साधिकाला त्याविषयी कळवते आणि ती जेवायला बसते. अजित : आलीस तू? आरती : हो..अभि नीट जेवला ना? अजित : हो आम्ही अगदी व्यवस्थित जेवलो आणि तू पण जेवून घे नीट पण त्या श्रेयाच्या जेवणाच काय? आरती : अहो, तिला मी इकडे घेऊन यायच्या आधी वरण-भात भरवला होता. तिला आता खोलीत झोपवून आलेय… अहो तुम्ही त्या तुमच्या डॉक्टर मित्राला बोलावता का घरी? म्हणजे ते श्रेयाला तपासातील आणि औषध देतील…तिने घडल्या घटनेचा फारच धसका लावून घेतला आहे…मला तर काळजीच वाटते आहे… अजित : हो मी त्याला संध्याकाळी बोलावतो… आणि आपण तिघे