सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग २ बापयांच्या फैलातले निम्मे गडी सुरुंग घालूक पाव हिश्शान गडी फोड कामार नी उरलेले गडी नी बायल मान्सा भर घालूक ठेवायाची. माजो अंदाज दोन आणे दुकू चुकणार नाय. बाबल्याच्या अंदाजावर भाऊचा पूर्ण विश्वास होता. तो हातातल्या चोपडीत गड्यानी केलेल्या अंदाजाप्रमाणे नोंदी करीत होता. ही चर्चा होईतो साडेबारा होवून गेले होते. लांबून जेवणकरी येताना दिसला. कामाचा अंदाज घेईतो संध्याकाळ होणार याची कल्पना असल्यामुळे गड्यांसह सात जणांच जेवण घेवून गडी पाठवायची आगावू व्यवस्था भाऊनी केलेली होती. आंब्याच्या सावलीत बसूनतांदुळाच्या भाकऱ्या काळ्या वाटाण्याची उसळ, खारातल्या मिरच्या नी दही खाल्ल्यावर सगळ्यानी पान जुळवून जरा आराम