सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1

  • 354
  • 1
  • 78

       सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग १                    नावळे दस्तुरी नाका ते चिवारी चवाठा सात मैल चार फर्लांग रस्त्या बांधायचं  कंत्राट चिवारीतल्या भाऊघाट्याने घेतलं ही वार्ता  पसरल्यावर जानशी, कुवेशी, नावळे, चिवेली आणि हरचली यापाच गावातल्या  पैसेवाल्या असामीना अगदीपोटशूळ उठला. हरचलीचा बळी भंडारी, कुवेशीतला बाबुराव देसाई आणि नावळे मुसलमान वाडीतला इद्रूसकोळशेकर हे सिलीपाट आणि खुटवळाचा धंदा करीत. देसायाचा पावसाळी काठ्या- बांबूचा मोठा धंदा होता. तो खाडी काठच्या सहा सात गावानी फिरून आगाऊ बयाणा देवून गावागावानी मुख्य  रस्त्याच्या कडेला  आवती, मलकी काठ्यांचे थप मारून ठेवीत असे. पाऊस सुरू झाल्यावर साधारण महिनाभरात बेटांची तोड होत असे. काठीची लांबी किती भरते