मनातली ती... आणि काळजातलं कुरुक्षेत्र?

  • 228
  • 90

1."पहिली उन्हाळी आठवण "त्या वर्षी मी अकरा वर्षांचा होतो.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, आणिघरात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती.आत्या आली होती घरी - तिच्या चेहऱ्यावरच्यामायेच्या रेषांमध्ये काहीतरी खास होतं.ती म्हणाली, "आपल्या गावाला चल, दोन-चारदिवस मज्जा कर."गेलो...त्या छोट्या प्रवासात मला काहीच कल्पना नव्हती की, आयुष्यभराच्या आठवणी मागे लागणार आहेत.गावात पाऊल टाकलं, आणि काही काळानंतर एक दृश्य मनात कोरलं गेलं.ती... वृषाली.तीही अकरा वर्षांचीच. सरळ केस, साधासा फ्रॉक, आणि नजरेत निरागसपणाचं गूढ काहितरी.ती काही बोलली नाही, पण तिचं ते पाहिलं हास्य... ते हसणं नव्हतं, ते काहीतरी खोल होतं - जणू माझ्याशी ओळख जुनीच होती.त्या एका क्षणात काहीतरी बदलून गेलं.ती फक्त एक नाव नव्हती,वृषाली - हे