समतेचं सप्तपदी

  • 297
  • 111

"समतेचं सप्तपदी"मुंबईच्या गजबजाटात, ट्रॅफिकच्या धावपळीला सवयीची झालेली अन्वया, एका मल्टीनॅशनल IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. शांत, शिस्तबद्ध, आणि नेहमी दुसऱ्याला मदत करणारी. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण ठामपणा होता – जणू कितीही अडचणी आल्या, तरी ती डगमगणार नाही. लहानपणापासूनच तिने स्वालंबिनीचे धडे घेतले होते. त्याचं कारणही तसंच होतं.अन्वयाच्या आयुष्यात तिची आईचं सगळं काही होती. तिचे वडील ती लहान असताना एका अपघातात गेले होते. आई – सुधा देशमुख – एका खासगी बँकेत क्लर्क म्हणून नोकरी करत करत, तिला शिकवली, मोठी केली, आणि एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणून घडवली. त्यांच्या घरात कधी चैन नव्हती, पण कमी पडल्यासारखंही कधी वाटलं नाही.त्या वर्षी अन्वयाच्या