भारत, भारत आहे, पाकिस्तान नाही *'भारत, भारत आहे. हा पाकिस्तान नाही. तशीच मी मुस्लीम आहे व त्याआधी भारतीय आहे. तसाच आतंकवाद्यांना कोणताच धर्म नसतो.' असं सोफिया कुरैशीचं मत. खरंच ती मुस्लीम असूनही तिनं भारताबद्दल केलंलं कार्य फार अनमोल आहे व ते भारतीय संविधानाला धरुन आहे. अशीच प्रत्येक मुस्लिमांनी भुमिका घेतली तर कोणतीच विदेशी ताकद भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. आतंकवादी तर नाहीच नाही.* आतंकवादी म्हणजे गुंड प्रवृत्तीची मंडळी. ज्याप्रमाणे गुंडांना जात धर्म नसतो. त्याचप्रमाणे आतंकवाद्यांनाही जात धर्म नसतोच. ही बाब सत्य आहे. असे असतांना पहलगाम इथं जो आतंकवादी हल्ला झाला व त्यात आतंकवाद्यांनी