श्रद्धा

  • 150

"आई म्हणायची... करतील स्वामी!"माझं लहानपण गावाकडं गेलं. घर छोटंसं, पण त्यात एक मोठी गोष्ट होती – आईची नितांत श्रद्धा. रोज सकाळी. न चुकता स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ती, दिवा लावायची, मनापासून ती त्यांची पूजा करायचीआणि माळ जपायची.मला तेव्हा काही कळायचं नाही. मी चिडायचो "आई, रोज काय त्या स्वामीस्वामी करतेस!"ती फक्त हसून म्हणायची, "स्वामी आहेत ना, चिंता करू नकोस."कधी कधी विचारायचो, "तुला कधी त्यांच्या दर्शनात आले का ग?"ती शांतपणे म्हणायची, "स्वामी दिसत नाहीत रे, पण समजून घेतात. त्यांच्या अस्तित्वाला डोळे नको, मन लागतं."काळ पुढं गेला. शहरात आलो. नोकरी लागली. धकाधकीचं आयुष्य सुरू झालं. पण आईचं एक वाक्य कायम राहिलं – "करतील स्वामी!"प्रत्येक