ऑपरेशन सिंदूर - भाग 9

  • 621
  • 237

९                   रुकसार आज म्हातारी झाली होती. परंतु तिला आठवत होत्या त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेदना. ज्या वेदना कधीही न विसरणाऱ्या होत्या.               रात्र बरीच झाली होती. रुकसारला झोप येत नव्हती. तशी ती अंथरुणावर पहुडली होती व झोप येत नसल्यानं ती सारखी कड फिरवीत होती. तिनं झोप घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु झोप येत नव्हती. तिच्या कानावर तो सारखा आवाज पडत होता. तो विमानाचा आवाज आणि तो क्षेपणास्त्राचा आवाज. त्या आवाजानं हादरलेला आसमंत तिच्यासमोर प्रत्यक्षात उभा होता. अशातच रुकसारला आठवला तो ऑपरेशन सिंदूरचा पराक्रम. जिनं एक मुस्लीम असूनही खरी भारतीय