ऑपरेशन सिंदूर - भाग 5

५                      युद्धजन्य परिस्थिती देशात निर्माण झाली होती. पाकिस्तान ड्रोनहल्ल्याचा मारा करीत होता. त्यानं दोन दिवसात तब्बल तीनशे ते चारशे ड्रोनहल्ले केले होते. मात्र भारतानं ते ड्रोनहल्ले आपल्या स्वदेशी बनावटीच्या आकाश नावाच्या क्षेपणास्त्रानं अगदी मिनिटाच्या आतच परतावून लावले होते. ज्याची क्षमता होती, पंचवीस किलोमीटर. ते क्षेपणास्त्र ५.७८ मीटर लांब होतं. ते क्षेपणास्त्र ९६ प्रतिशत भारतीय बनावटीचं होतं. तशीच त्याच्यात एकाच वेळेस अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई हमल्याला सामोरे जाण्याची क्षमता होती.          आकाश क्षेपणास्त्र सन १९८३ ला बनविण्यात आलं होतं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते भारतीय सैन्यात दाखल झालं नव्हतं. काही