ऑपरेशन सिंदूर - भाग 4

  • 207
  • 63

४                   ऑपरेशन सिंदूर झालं होतं. ज्यात बरीचशी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट केल्या गेली होती. जीवीतहानी झाली नव्हती. तसं पाहिल्यास ऑपरेशन सिंदूर हा उपक्रम यशस्वी झाला होता. ज्याचं श्रेय रुकसार व तिच्या चमूला गेलं होतं व रुकसार चर्चेत आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला होता व तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला होता. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण होतं आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केली होती. पाकिस्तानला नष्ट केलं नव्हतं. ज्याला पाकिस्तान नाकारत होता.         आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं