३ रुकसार तिचं नाव होतं. नावाप्रमाणेच ती लाजवंत होती लहानपणी. तिला कोणीही काही म्हटल्यास ती शरमत असे व घरात जावून मुसमुसून रडत असे. या तिच्या वागण्याबाबत तिचे आईवडील चिंतेत असायचे. त्यांना वाटायचं की ही अशीच मुसमुसून रडत बसली तर हिचं कसं होईल. आज ती वैमानिक बनली होती व ती केवळ वैमानिकच नाही तर विंग कमांडर बनली होती. रुकसार आज वैमानिक बनली होती. लहानपणची लाजीरवाणी, डरपोक रुकसार नव्हती आता ती. तिला भीती अजिबात वाटत नव्हती. ती विमान जेव्हा चालवायची. तेव्हा तिला अजिबात भीती वाटायची नाही. आकाशात दूर अंतरावर ती