ऑपरेशन सिंदूर - भाग 2

२       ऑपरेशन सिंदूर (कादंबरी)                 अंकुश शिंगाडे            कुंकू..... कुंकूला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्याला सौभाग्याचं लक्षण समजलं जातं, नव्हे तर प्रत्येक सणासुदीला महिला वर्ग कुंकू लावून सण साजरे करतांना दिसतात. कुंकू हे स्रियांच्या सौंदर्यातील सोळा श्रृंगारापैकी एक वस्तू आहे. ते विजयाचं प्रतिक आहे. एवढंच नाही तर अगदी विवाह करतांना नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरुन तिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. असे करतांना स्री आपल्या घरी विजयोत्सव साजरा करते. कारण तिनं आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन कुणालातरी आणलेलं असतं.         पुर्वी जगात मातृसत्ताक कुटूंब पद्धती होती. ज्यात