फक्त मिठीत घे

  • 300
  • 96

तो बाहेर सोफ्यावर बसून शूज घालत होता.  ती : "अहो हे घ्या."  ती त्याच्या समोर डब्बा पकडत म्हणाला.  तो : "ठेव बाजूला."  तसे तिने तो डब्बा त्याच्या बाजूला ठेवला.  तो : "आज यायला उशीर होईल...आजचे माझे जेवण करायची गरज नाहीये."  ती : "ठीक आहे." आणि तो निघून गेला.    आज लग्न होऊन एक महिना झाला होता. म्हणायला फक्त राजा राणीचा संसार. पण खरच राजा ह्या राणीचा होता का?   तिने सगळे तिची कामे आवरली आणि आता टिव्ही समोर बसली. समोर लावलेली गाणी पाहत होती पण मनात एकच विचार...  "आज लग्न होऊन एक महिना झाला... पण हे जवळ कधी येत नाही..