आजोबांच्या म्हणजेच आंजनेयच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून दिगंबर विचारात पडतो. आज ना उद्या आंजनेय मदतीला बोलावणार याची खात्री त्याला होतीच पण हे इतक्या लगेच घडेल असे त्याला वाटले नव्हते. त्याचे विचारचक्र चालूच होते की तिथे साधिका येते. तिला पाहून त्याला धक्काच बसतो तर, कुर्ता आणि जीन्समध्ये तिच्यासमोर उभ्या असलेल्या दिगंबरला पाहून ती चकित होते. म्हणजे याला कोणी पाहिलं तर कोणाला खरं वाटणारं नाही की हा एक नावाजलेला अघोरी आहे. दिगंबर : तू नक्की कोण? साधिका : मी साधिका, आजोबांची नात… दिगंबर : अंजनीची मुलगी का तू ? साधिका : नाही…माधवची मुलगी मी… दिगंबर : बर… हे दोघे बोलत असतानाच तिथे आजोबा