त्यांचं नातं त्यानेच संपवलं होत अन कारणही असं होत जे व्हॅलिड नव्हतं.... आज पुन्हा त्याच ठिकाणी ती बसलेली तिथे हा आलेला... जवळजवळ सहा महिने झालेले आज तिला हसतांना पाहुन तिच्या जवळ आलेला तो.."....मी सोडून गेलो, पण तू सावरलीसच ना ग..." त्याने अगदी तिच्या कडे बघत विचारलं..."....वाईट वाटतय का, तुझ्या शिवाय सावरलेय कि आनंद होतोय आत्ता जून दुखणं घेऊन रडून नाही दाखवणार तुला याच...?" हिने सुद्धा त्याच टोन मध्ये म्हंटल.".. अग उलट आनंद होतोय... कस का होईना पण सावरलीस तरी..." त्यावर मुलगी बळेच हसली..."....हो सावरले... सावराव लागलं.. कारणं मला मदतीच्या वेळीस मदत करणार कुणी मिळालंच नाही..." हिने उपहासत्मक हसू चेहऱ्यावर आणत म्हंटल."...सांग