गुपित गोडगोड संसाराच्या उंबरठ्यावर(एका स्वानुभवातून उमललेली कथा)पहाटेचा गारवा नुकताच गच्चीत पसरायला लागलेला. मीतालीने स्वयंपाकघरातून डोकावून विवेककडे पाहिलं. अजूनही झोपेत होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू आलं."कालचा तोच माणूस का रे हा?" तिने कुजबुजत स्वतःलाच विचारलं.पण ती ओठांवरची स्मितरेषा क्षणातच विरून गेली… कारण कालचं भांडण अजून मनात होतं.“तुला काय वाटतंय, सासूबाईंना उत्तर दिलं म्हणजे मोठं झालं का मी?”मीतालीचा आवाज थोडा चढलेलाच होता.विवेकही थांबला नाही, “तू सारखं छोट्या छोट्या गोष्टीत माहेरच्या लोकांना सांगत राहशील, तर हा संसार आपण दोघं करतोय की तुझं माहेर?”क्षणभर शांतता. आणि मग दार आपटून मीताली बेडरूममध्ये निघून गेली होती.आज सकाळ मात्र निराळी होती. भांडणानंतरचा तो ‘गप्पांचा गारवा’ घरभर पसरलेला.मीताली