घराघरांतून संभाजी, शिवाजी निर्माण व्हावेत

घराघरांतून शिवाजी, संभाजी निर्माण व्हावा?                 *हिंमत..... कुणीतरी हिंमत दाखवायलाच हवी. कारण हिंमत जर दाखवली नाही तर कोणीही या देशात येईल व औरंगजेब बनेल व संभाजीसारख्या विरांची हत्या करुन महाराणी येशुबाईचं कुंकू पुसेल. तसाच अफजलखान येईल व तो येथील निरपराध लोकांचा बळी घेईल. निरपराध गाई गुरांना व पशुंना त्रास देईल. तसाच देवळे व देवळातील मुर्ती नष्ट करेल. त्यासाठी कुणाला तरी शिवाजी, संभाजी बनावंच लागेल. परिणाम माहित असतांनाही. कारण हातात सापडल्यास किंवा संधी मिळाल्यास हेच औरंगजेब तळपू तळपू या नश्वर देहाला संपवतील. म्हणूनच हिंमत करावी लागेल कुणाला तरी संभाजी बनण्याची आणि कुणाला तरी शिवाजी बनण्याची.