शाल्मली

  • 471
  • 183

"हॅलो!" ओह, व्हॉट ए surprise.. " - चैतन्य ला दारात बघून शाल्मली म्हणाली.तो आत येताच तिने त्याला मिठी मारली.."अग, हो हो बसू दे त्याला जरा.."शाल्मलीची आई म्हणाली. तेवढ्यात शाल्मली चैतन्य साठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. सोफ्यावर आई आणि चैतन्य बसून होते. कॉलेजपासून ची जिवलग मैत्रीण शाल्मली चैतन्यची. अख्ख्या कॉलेजमध्ये त्याची बाजू घेणारी.. आणि वाटलंच तर ह्याच्या वाटेल जाऊन धडा शिकवणारी. चैतन्य पण काही घाबरट नव्हता पण मुळात त्याला भांडण हा विषयच आवडायचा नाही. कॉलेजची ५ वर्ष दोघे एकत्र एकाच वर्गात. पुढे तिने चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं ठरवलं आणि ह्याने पत्रकार. कॉलेज संपल्यावर दोघांचे मार्ग वेगळे झाले पण दोघांनी भेटणं सोडलं नाही.