"आईचं प्रेम, हिशोबात नाही.""माझी आई… शेवटीही माझीच होती!"त्याची मनापासून इच्छा होती… आईच्या शेवटच्या प्रवासात सगळं स्वतःच्या हातांनी करावं. अगदी उरलेले क्षण तिच्या पायाशी बसून घालवावे. तिच्या मस्तकावर शेवटचा हात फिरवावा. पण घरच्यांनी त्याला थांबवलं."तू कुठे होतास तिच्या शेवटच्या क्षणी? दूर देशात, नोकरीच्या मागे धावत!""तुला काय हक्क आहे आता तिच्या शेवटचं करत बसण्याचा?""सगळी सेवा आम्हीच केली. रात्री रात्र जागून तिची काळजी घेतली आम्ही.""आता प्रेम दाखवायचं? उशिर झाला रे!"तो शांत होता… पण आतून मोडला होता.त्याला ओरडून सांगावंसं वाटत होतं –"तुम्ही तिची सेवा केली, शारीरिक… मी तिला आठवणीत ठेवत गेलो, दर क्षणाला.प्रत्येक श्वासाला,तुम्ही तिचं औषध वेळेवर दिलं, मी तिचं नाव दिवसातून दहा वेळा