देवाला जावे निवांत दर्शन घ्यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण आजकाल गर्दीमुळे देवदर्शन निवांत होईलच याची खात्री नसते मला मात्र देवदर्शन घ्यायची इच्छा होते तेव्हा कशी कोण जाणे देवळात गर्दी कमी असते आणि देवाचा आणि माझा आमने सामने सुसंवाद सुद्धा होतो असा अनुभव नेहेमीच येतो तसेच बाहेर गावी देवदर्शनाला जायचे असेल तर तशा प्रवासाचा योग जुळून यायला लागतो मगच तुमचे दर्शन घडते दर्शनासाठी देव आपल्याला बोलावून घेतो अशीही श्रद्धा असते असा अनुभव मलाही आला देवी त्रिपुरसुंदरीच्या बाबतीत.. पुतण्याचे लग्न राजस्थानी मुलीशी त्यांच्या पद्धतीने व्हायचे होते कारण मुलीचे घर बांसवाडा राजस्थान इथे होते तिथेच साखरपुडा व लग्न कार्यक्रम व्हायचा होता खरेतर एका वेगळ्याच दुसऱ्या महत्त्वाच्या कामामुळे तिथे जाणे जमणार नव्हते त्यामुळे घरच्या लोकांसोबत जाण्यासाठी